जन संघर्ष अर्बन निधीच्या संचालकांनी ठेवीदारांची तब्बल ४४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात एकूण नऊ आरोपी असून त्यापैकी सहा आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत, तर तीन आरोपी अद्याप कारागृहात आहेत. या प्रकरणातील आरोपी प्रीतम देवानंद मोरे याने दारव्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र या जामीन अर्जावर ठेवीदारांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे. दारव्हा सत्र न्यायालयाने सदर जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली.