नागपूर ग्रामीण: ऑर्डनन्स फॅक्टरी मधील कर्मचाऱ्याला लुटणाऱ्या टोळीला दोन दिवसात वाडी पोलिसांनी केली अटक
21 ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार श्रीकृष्ण झाडखंडे हे ऑर्डनन्स फॅक्टरी येथे कार्यरत असून ते 18 ऑक्टोबरला रात्री साडेदहा वाजता च्या सुमारास जंगलातून जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने घरी जात असताना अंधारात दबा धरून बसलेल्या तीन आरोपींनी त्यांना धक्का मारून खाली पाडले आणि त्यांच्या खिशातील दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि पन्नास रुपये हिसकावून पळ काढला. याप्रकरणी वाडी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.