हिंगणघाट: राष्ट्रीय महामार्गावरील कलोडे चौक ते उपजिल्हा रुग्णालय परिसरातील वाहतूक समस्येची आमदार कुणावार यांच्याकडून तातडीने दखल
हिंगणघाट शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील कलोडे चौक तसेच उपजिल्हा रुग्णालय चौक दरम्यान असलेल्या उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असल्याने या रस्त्यावर वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे, रस्त्यावर होणाऱ्या अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. या निर्माणाधीन उड्डाणपुलाचे बांधकामामुळे उद्भवलेल्या वाहतूक समस्येसंदर्भात आ.समीर कुणावार यांनी संबंधित अधिकाऱ्यांची स्थानिक तहसील कार्यालयात तातडीची बैठक घेतली यासंबंधी हलगर्जीपणा खपवून घेतल्या जाणार नसल्याचा इशारा उपस्थितांना दिला.