अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी रात्री च्या सुमारास घायगाव पाटीजवळ घडली. प्रदीप अशोक काळे वय 28 राहणार आदिवासी कॉलनी, अमोल सुनील गोरे वय 16 वर्षे राहणार आदिवासी कॉलनी अशी घटनेतील मयतांची नावे आहे.या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार प्रदीप व अमोल हे दुचाकीवरून जात असताना त्यांचा घायगाव पाटी येथे अपघात झाला.