राहुरी: मुळा धरणातून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढविला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
राहुरी येथील मुळा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला असल्याने आज सायंकाळी मुळा धरणातून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज सोमवारी सायंकाळी 5:30 मिनिटांनी मुळा धरणातून नदीपात्रामध्ये 2000 क्युसेक्स वरून 7000 हजार क्युसेक्स पर्यंत हा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.