नंदुरबार: जय वळवी खून प्रकरणी मूक मोर्चा पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र कडकडीत बंद
नंदुरबार शहरात सिंधी कॉलनी परिसरात आदिवासी युवक जय वळवी याचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी आज नंदुरबार शहरातून विविध आदिवासी संघटनेच्या माध्यमातून मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपली आस्थापने बंद ठेवले आहेत शहरात सर्वत्र कडकडीत बंद पहायला मिळत आहे.