कारंजा: चोरट्यांच्या वक्रदृष्टीने शेतकऱ्यांच्या ओलीतांची झाली अडचण.. राजनी शिवारात शेताच्या रूमच्या बाहेर ठेवलेली मोटर चोरी..
चोरट्याची वक्रदृष्टी आता शेतकऱ्यांच्या साहित्याकडे वळल्याने शेतकरी अडचणीत आले आहे दोन दिवसांपूर्वीच शेत कुंपणाचे तार आणि अँगल चोरीला गेले होते आता राजनी शिवारात शेताच्या रूमच्या बाहेर ठेवलेली ओलिताची मोटर चोरट्यांनी लंपास केल्याची घटना दिनांक एक तारीख ते दोन तारखेच्या दरम्यान घडली या प्रकरणी तपास केला असता मिळून आली नाही त्यामुळे दिनांक सहा तारखेला फिर्यादीने कारंजा पोलिसात तक्रार दाखल केली आहे कारंजा पोलिसांनी अपराध क्रमांक 689/2025 कलम 303 2 bns चोरीनुसार गुन्हा दाखल केला