सातारा: नैसर्गिक आपत्तीच्या संकटावर उपाय: जोडधंदा म्हणून रेशीम उद्योग शेतकऱ्यांसाठी लाभदायक — संदीप फुंदे
Satara, Satara | Nov 30, 2025 सातारा परिसरात वारंवार होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असून पारंपरिक शेतीवर पूर्णपणे अवलंबून राहणे धोक्याचे बनले आहे. अशा परिस्थितीत शेतीला जोडधंदा म्हणून रेशीम शेती उद्योग अधिक फायदेशीर ठरत असल्याचे मत संजीवन कृषी उद्योगाचे संचालक संदीप फुंदे यांनी व्यक्त केले. साताऱ्यात संजीवन नारीशक्ती उद्योग यांच्या वतीने महिला शेतकऱ्यांसाठी विशेष अभियान राबवण्यात आले. या उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना फुंदे बोलत होते.