कायाकल्प असेसमेंट अंतर्गत वाशिम तालुक्यातील चार आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांना भेट
1.7k views | Washim, Washim | Nov 29, 2025 वाशिम, 28 नोव्हेंबर 2025 — वाशिम तालुक्यातील एकूण 10 आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांपैकी तांदळी शेवई, कोंडाळा झांबरे, तामसी आणि तांदळी बु. या चार उपकेंद्रांना आज कायाकल्प असेसमेंट अंतर्गत निरीक्षणासाठी भेट देण्यात आली.ही भेट आदरणीय डॉ. महेशचंद्र चापे (तालुका आरोग्य अधिकारी, कार्यालय मानोरा) यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमसह पार पडली.