समुद्रपूर: शिवणफळ येथे विष मुक्त आहार अभियानांतर्गत मगन संग्रहालयाच्या वतीने आयोजित करण्यात आली किसान चावळी बैठक
आधुनिक शेतीच्या प्रवाहात रासायनिक युक्त जीवन झाले असून मानवी खाणपान बदलले आणि विविध आजाराने घर केले.आज निरोगी व्यक्ती शोधून सापडणार नाही अशी स्थिती आहे.यातुन नागरिकांना निरोगी जिवन देण्यासाठी गिरड मगन संग्रहालयाच्या वतीने किसान चावळी शेतकरी बैठक उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमा अंतर्गत शिवणफळ गावात शनिवारी २० एप्रिलला रात्री ८ वाजता किसान चावळी शेतकरी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मगन संग्रहालयाचे समन्वय गजानन गारघाटे, प्रगतिशील शेतकरी चक्रधर भगत, यांनी मार्गदर्शन केले.