समुद्रपूर: तावी येथे विष मुक्त आहार उपक्रमाअंतर्गत मगन संग्रहालयाच्या वतीने किसान चावळी बैठक
आधुनिक शेतीच्या प्रवाहात रासायनिकयुक्त जीवन झाले असून, मानवी खाणपान बदलले आणि विविध आजाराने घर केले. आज निरोगी व्यक्ती शोधून सापडणार नाही, अशी स्थिती आहे. यातुन नागरिकांना निरोगी जिवन देण्यासाठी गिरड मगन संग्रहालयाच्या वतीने किसान चावळी शेतकरी बैठक उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत तावी गावात १८ एप्रिलला १२ वाजता किसान चावळी शेतकरी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.