समुद्रपूर: मोहगांव येथे हनुमान मंदीर कमेटिच्या वतीने आयोजित ७ दिवसीय अखंड भागवत सप्ताहाला आज पासून प्रारंभ
समुद्रपुर तालुक्यातील मोहगांव येथे हनुमान मंदीर देवस्थान कमेटिच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही शुक्रवारी १ वाजता पासून ह.भ.प. रुपेश महाराज तळवेकर यांच्या शुभहस्ते ७ दिवसीय अखंड भागवत सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला तर सायंकाळी ६ वाजता विविध देखाव्यासह पहिल्याच दिवशी ह.भ.प. रुपेश महाराज तळवेकर यांनी उपस्थित गावकऱ्यांना भक्तीचे धडे गिरविले या सप्ताहाच्या निमित्ताने गावात भक्तीमय वातावरणात निर्माण झाले आहे.