गोंदिया: जांभळी फाट्याजवळ अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू
Gondiya, Gondia | Nov 27, 2025 सडक अर्जुनी तालुक्यातील जाभळी दोडके ते गोंदियाकडे जात असलेल्या दुचाकी चालकाचा जांभळी फाट्याजवळ अपघाती मृत्यू झाला. सदर घटना दिनांक 26 नोव्हेंबर रोजी बुधवारला रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली. डिकेश मरस्कोल्हे असे मृतकाचे नाव आहे. मृतक दुचाकीने जांभळी येथून गोंदियाकडे जात होता. जांभळी फाट्याजवळ असलेल्या रस्ता दुभाजकावर तोल गेल्याने धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला.