शेतातून दुचाकी ने घरी जात असताना समोर येणारी बस दिसताच एकदम घाबरल्याने दुचाकी स्वार बसच्या पुढील भागात आला त्यामुळे तो गंभीर जखमी झाल्याची घटना लहान आर्वी अंतोरा मार्गावर आज दुपारी पावणे पाच च्या दरम्यान घडली त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती गोविंद कोहळे असे जखमी झालेल्यांचे नाव आहे घटनेची माहिती मिळताच फौजदार राजेश उंदीरवाडे आणि तळेगाव सहाय्यक वाहतूक निरीक्षक विद्या ठाकरे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असल्याची माहिती आज सायंकाळी साडेसात वाजता देण्यात आली.