सटाणा तालुक्यातील जायखेडा येथे कटिंग मशीनमध्ये हात अडकल्याने अंगठा झाला वेगळा सटाणा तालुक्यातील जायखेडा येथील राजेंद्र देविदास शेवाळे (वय ४९) हे आपल्या किराणा दुकानात काम करत असताना भीषण अपघाताला सामोरे गेले. काल दिनांक 22 ऑक्टोंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास दुकानात कटिंग मशीनद्वारे नारळ कापताना अचानक त्यांचा हात मशीनमध्ये अडकल्याने डाव्या हाताचा अंगठा जवळजवळ पूर्णपणे कापला गेला आणि फक्त त्वचेच्या एका भागाने लटकत राहिला.