वाशिम: पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते नियोजन भवन येथे सेवा पंधरवड्याचे ऑनलाईन उद्घाटन संपन्न
Washim, Washim | Sep 17, 2025 छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या सेवा पंधरवड्याचा शुभारंभ आज दि.१७ सप्टेंबर रोजी नियोजन भवन सभागृहात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणाली द्वारे झाला. यावेळी व्यासपीठावर विधानपरिषद सदस्य आ.किरणराव सरनाईक, विधानसभा सदस्य आ.सईताई डाहाके (दूरदृष्यप्रणालीद्वारे) उपस्थित.