राज्यातील वाढत्या रस्ता अपघातांच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने वाहन चालकांच्या परवानाधारक चाचणी प्रक्रियेत मोठे बदल आणि सुधारणा लागू केली असून सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. सोमवार दि. 8 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार बेफिकीर व निष्काळजी वाहनचालकांमुळे होणार्या अपघातांचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट या उपक्रमामागे आहे.जालना येथील आरटीओ कार्यालयाच्या परिसरात त्यासाठी लागणारे सीसीटीव्ही बसविले आहे.