शहरातील बीएसएनएल टॉवरवर चढून आंदोलन!
Beed, Beed | Oct 29, 2025 डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी आज बीड शहरात एक अनोखे आंदोलन करण्यात आले. गुरुवार, दि. 29 ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता, काही आंदोलकांनी बीड शहरातील बीएसएनएल टॉवरवर चढून आपला निषेध नोंदवला.या आंदोलकांनी “डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळालाच पाहिजे” अशा घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधले.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना खाली उतरवण्याचा प्रयत्न केला.या आंदोलनामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल