पुणे शहर: पुण्यातील कोंढवा परिसरात गोळीबार;आंदेकर टोळीतील सागर काळेचा भाऊ गणेश काळे ठार
पुण्यातील कोंढवा परिसर पुन्हा एकदा गोळीबाराने हादरला आहे. खडी मशीन चौकात झालेल्या या गोळीबारात गणेश काळे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, गणेश काळे हा आंदेकर टोळीतील नंबरकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सागर काळे याचा भाऊ आहे.