उदगीर: उन्हाळी क्लासेसच्या नावाखालील फिसची लूट थांबवावी, शिवसेनेचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
Udgir, Latur | May 13, 2025 उदगीर तालुका व परिसरातील उन्हाळी क्लासेसच्या नावाखालील विद्यार्थी व पालकांकडून बेकायदेशीर फिस वसुली थांबवावी अशी मागणी शिंदे गट शिवसेनेच्या वतीने गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे,एका वर्गातून उत्तीर्ण होऊन पुढे गेलेल्या विध्यार्थ्यांकडून क्लासेसच्या नावाखाली हजारो रुपये फीची वसुली करून शिक्षणाचा बाजार चालू झाला आहे,क्लासेसच्या नावाखाली वसूल होणारी फी थांबवा अन्यथा आंदोलन करू असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.