लोणार: शहरातील बस स्थानक येथे मोबाईल चोरणाऱ्या महिलेस अटक, मोबाईल सह 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Lonar, Buldhana | Sep 15, 2025 लोणार शहरातील बस स्थानक येथे बसमधून खाली उतरत असताना प्रवाशाच्या खिशातील मोबाईल लंपास करणाऱ्या महिलेला लोणार पोलिसांनी अटक केली आहे. दिनकर भगवान गुंड हे छत्रपती संभाजीनगर येथून 10 सप्टेंबर रोजी बसने लोणार येथे आले होते. दरम्यान, बसमधून खाली उतरत असताना त्यांचा 10 हजार रुपये किंमत असलेला मोबाईल चोरी गेल्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तपास सुरू केला.