अंबड परिसरातील विवाहित महिलेचा लोकमान्य नगर,ठाणे येथे माहेरून दहा लाख रुपये घेऊन येण्यासाठी मारहाण व छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू व नणंद यांच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी पीडित महिला ही लोकमान्य नगर ठाणे येथे सासरी नांदत असताना वतीने वेळोवेळी इच्छेविरुद्ध अनैसर्गिक कृत्य करून फिर्यादी यांना त्रास दिला तसेच सासू व नणंद यांनी वेळोवेळी बाहेरून दहा लाख रुपये घेऊन येण्यासाठी दमदाटी करून अश्लील शिव्यागाळ केल्या.