वैजापूर: चांदेगाव आवलगाव व बाजार ठाणे गावांमध्ये शेतकरी संघटनेचे शाखेचे उद्घाटन व मेळावा संपन्न
वैजापूर तालुक्यातील येलमवस्ती, चांदेगाव, आवलगाव व बाजाठाण या गावांमध्ये शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन व शेतकरी मेळावा आज मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाचे उद्घाटन शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष व कायदे तज्ञ अजित काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.