माण: गरुड गॅंगचा बिमोड; म्हसवड पोलिसांची धडाकेबाज कारवाई, नागरिकांनी केले कारवाईचे स्वागत
Man, Satara | Nov 26, 2025 म्हसवड परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या तथाकथित गरुड गॅंगवर पोलिसांनी वेळीच आणि अचूक कारवाई करत चार संशयितांना घातक शस्त्रांसह ताब्यात घेतले आहे. या ऑपरेशनमुळे शहरात अल्पावधीतच शांततेचे वातावरण असून नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे जोरदार स्वागत केले आहे. बुधवारी दुपारी तीन वाजता म्हसवड पोलीस ठाण्यातून याबाबत माहिती मिळाली. गोपनीय सूत्रांकडून गॅंगशी संबंधित खात्रीशीर माहिती म्हसवड पोलिसांना मिळाली. सोशल मीडियावर तलवार, कोयते दाखवत “नायक नही खलनायक हु मै” यासारख्या गाण्यांवर रिल्स बनवले.