सांगोला: लग्नाचे आमिष देऊन अल्पवयीनवर अत्याचार; अर्भकास जन्म; तालुक्यातील एका गावातील घटना
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने तिने अर्भकास जन्म दिला. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सुनील खरात याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सांगोला तालुक्यातील एका गावात घडली. पीडितेने दिलेल्या फिर्यादीत आरोपी सुनील खरात याने पुण्याहून गावी येऊन रात्री १० वाजता पीडितेच्या वडिलांच्या मोबाइलवर मेसेज पाठवून तिच्या घरापाठीमागील शेताच्या बांधावर तिला बोलावून घेतले. त्याने तिला 'तू मला आवडते. तू माझ्याशी लग्न कर. म्हणत अत्याचार केला आणि तो फरार आहे.