छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातले पर्यटन स्थळे पर्यटकांनी फुलले दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे गर्दी वाढली
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 26, 2025
आज दि 26 सप्टेंबर सकाळी दहा वाजता दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे खुलताबाद तालुक्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसर रविवारी पर्यटकांच्या प्रचंड गर्दीने फुलून गेला . वेरूळ लेणीसह दौलताबाद देवगिरी किल्ला, बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदीर आणि खुलताबाद येथील भद्रा मारूती मंदीरात भाविक व पर्यटकांची मोठी गर्दी झाली. सकाळपासूनच लेणी परिसरात तिकिटघरांवर रांगा लागल्या तर वाहनतळ पूर्ण भरल्याने अनेकांनी रस्त्यावरच वाहने उभी केली. वेरूळ घाट ते वेरूळ गावापर्यंत वाहतूक कोंडी झाल्याने पर्यटकांना