दिग्रस नगर परिषद हद्दीतील इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, विधवा व दिव्यांग योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट (डी.एल.सी.) शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर दिनांक ७ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ०४ वाजेपर्यंत नगर परिषद मराठी शाळा क्रमांक आठ, संभाजीनगर येथे होणार आहे. दिग्रस परिसरातील सर्व लाभार्थ्यांनी आपले डिजिटल लाईफ सर्टिफिकेट काढून घ्यावे, कारण प्रमाणपत्र केल्यानंतरच अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.