शिरपूर: तालुक्यातील सांगवी पनाखेड दरम्यान खाजगी प्रवासी बसला भीषण अपघात, अज्ञात वाहनाची जोरदार धडक, 7 ते 8 प्रवासी गंभीर जखमी
Shirpur, Dhule | Nov 9, 2025 मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील सांगवी ते पनाखेड दरम्यान 9 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 10 वाजेच्या सुमारास खाजगी प्रवासी बसला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील सुमारे 7 ते 8 प्रवासी गंभीर जखमी झाले असून, अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, शिरपूर तालुका पोलीस तसेच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे.