जाफराबाद: जाफराबाद भोकरदन महामार्गावर बोरगाव फाट्यावर सकल धनगर समाज बांधवांनी मेंढ्या सह केले रास्ता रोको आंदोलन
आज दिनांक एक आक्टोंबर 2025 वार बुधवार रोजी दुपारी 1 वाजता धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी जाफराबाद भोकरदन महामार्गावर बोरगाव फाट्यावर सकल धनगर समाज बांधवांनी चक्क मेंढ्या सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन करत धनगर समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले आहे. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करत हजारोच्या संख्येने धनगर समाज बांधवांनी हा रास्ता रोको आंदोलन केला आहे.