उमरखेड: देवसरी येथे शुल्लक कारणातून एकास मारहाण,आरोपी विरुद्ध उमरखेड पोलिसात गुन्हा दाखल
फिर्यादी लता गणेश शिरमाळ यांच्या तक्रारीनुसार 21 ऑक्टोबरला दुपारी अडीच वाजताच्या सुमारास आरोपी माधव शिरमाळे यांच्या घरचे बकरीचे पिल्लू फिर्यादीच्या घरात गेल्याने फिर्यादीने त्या पिलाला हाकलले तेव्हा याच कारणावरून आरोपी माधव शिरमाळे व आणखी दोन अशा तिघांनी फिर्यादी सोबत वाद करून शिवीगाळ केली व कपाळावर मारून जखमी केले. व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी 21 ऑक्टोबरला रात्री अंदाजे दहा वाजताच्या सुमारास उमरखेड पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.