दारव्हा: अखेर प्रशासन जागे; चिखली–मानकोपरा मार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
चिखली ते मानकोपरा दरम्यान असलेला पुलाजवळचा रस्ता गेल्या काही दिवसांपासून अत्यंत खराब अवस्थेत होता. खोल खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, महिला आणि वृद्ध नागरिकांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत होता. या संदर्भात पब्लिक आपने दि. ४ नोव्हेंबरला “चिखली ते मानकोपरा मार्गावरील खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता” या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करतात कामाला सुरुवात झाली.