आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीवर माजी खासदारांचा पीए, पोलिसांचा दबाव; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 25, 2025
आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीनं चौकशी समितीसमोर एक स्टेटमेंट दिलं आहे. यात त्यांनी स्पष्ट म्हटलंय की, त्यादिवशी रात्री दोन खासदारांचे पीए आले होते. एक आहेत नाग टिळक आणि दुसरे राजेंद्र शिंदे. त्यांनी डॉक्टरांशी बोलणं करून दिलं. यावेळी चुकीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट देण्यासाठी पोलीस आणि राजकीय दबाव डॉक्टर तरुणीवर होता. अस अंबादास दानवे म्हणाले आहेत.