गोंदिया: कामगार कल्याण विभागाला राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिली भेट.
Gondiya, Gondia | Sep 15, 2025 कामगार कल्याण विभागाला विद्यार्थ्याने दिली भेट. आज तारीख 15/09/2025 रोज सोमवारला 12:00 वाजे राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने कामगार कल्याण विभागास भेट दिली.त्यावेळी कामगार कल्याण आयुक्त श्री.राजगीर दुर्वे सर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दुकाने निरीक्षक रोकडे सर आणि शर्मा सर उपस्थित होते,ह्या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.