वाशिम: मेल नर्सेस बचाव समितीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्ला बोल मोर्चा,नर्सिंग भरतीतील लिंगभेदाचा निकष दूर करण्याची मागणी
Washim, Washim | Sep 15, 2025 वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग यांनी भरतीसाठी काढलेल्या 80 टक्के महिला व 20 टक्के पुरुष या अन्यायकारक निकष रद्द करण्याकरीता मेल नर्सेस बचाव समिती यांच्यावतीने दि. 15 सप्टेंबर रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात जोरदार निदर्शने करुन जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले. यावेळी नर्सिंग विद्यार्थी व प्रशिक्षण पूर्ण केलेले युवक व युवती तसेच नर्सिंग स्टाफ यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करुन आमच्यावर होणार अन्याय दुर करण्याची मागणी केली.