शिंदखेडा: बिजासनी मंगल कार्यालय येथे भाजपा पक्षाच्या वतीने सह विचार सभा मोठ्या उत्साहात संपन्न.
शिंदखेडा शहरातील बिजासनी मंगल कार्यालय येथे शिंदखेडा नगरपंचायत च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने आज दिनांक सात नोव्हेंबर रोजी सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस या सभेमध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व तसेच इच्छुक उमेदवार यांची या ठिकाणी मुलाखती देखील घेण्यात आल्या. धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण अध्यक्ष बापूसाहेब खलाणे या ठिकाणी उपस्थित होते.