आर्वी: सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी चोरट्यास केले जेरबंद.. एकूण 2 गुन्हे उघड आरोपीस अटक 1लाख 81 हजाराचा मुद्देमाल जप्त
Arvi, Wardha | Nov 10, 2025 अनोळखी इसमाने खूबगाव रोडवर महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास केल्याची घटना दिनांक 21/10 ला घडली होती .. त्या संदर्भात पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला होता तसेच दुसऱ्या गुन्ह्यात पिण्यास पाणी मागून मुलाला चाकूचा दाखवून ऐवज लंपस केला होता याही घटनेचा तपास पोलीस करीत होते पोलिसांनी दरम्यान तपास करून दोन गुन्हे उघड केले आणि एका आरोपीला अटक केली त्याच्याकडून 1लाख 81 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी आज दुपारी तीन वाजता प्रेस नोट द्वारे दिली आहे..