शहरातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने पवनी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. विजया राजेश नंदुरकर ठाकरे यांनी आज 9 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास ग्रामीण रुग्णालय, पवनी येथे धडक भेट देत 'ऑन द स्पॉट' पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी रुग्णालयातील औषध साठ्याची उपलब्धता, लेबर रूम आणि ऑपरेशन थिएटरची (OT) सूक्ष्म तपासणी केली. तसेच पोस्टमार्टम रूमच्या स्वच्छतेबाबत आणि सोयीसुविधांबाबत त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.