जालना: महावितरण अधिकारी व कर्मचार्यांच्या निलंबनाची मागणी; पत्रकार संघटनेचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन
Jalna, Jalna | Sep 17, 2025 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जालना येथे आलेेल्या जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना बुधवार दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात जालना शहरातील मस्तगड परिसरातील महावितरण कंपनीच्या अधिकार्यांची आरेरावी दिवसेंदिवस वाढत असल्याबद्दल गंभीर तक्रार नोंदविण्यात आली. त्यामुळे दोषी अधिकार्यांना निलंबीत करण्याची मागणी करण्यात आली. महावितरणचे संबंधित अधिकारी व कर्मचारी नागरीकांशी आरेरावीने वागतात.