कोरची: कोरची नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराचा विरोध; तहसील कार्यालयावर नागरिकांचा धडक मोर्चा
कोरची नगरातील नागरिकांनी शहरातील महात्मा फुले चौक ते तहसील कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढून कोरची नगरपंचायत हद्दीतील २४ ज्वलंत समस्या निकाली लावण्यासाठी आज दि.२३ सप्टेंबर मंगळवार रोजी दूपारी २ वाजता तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना तहसीलदारामार्फत निवेदन पाठविण्यात आले.