कोरची: कोरची तालुक्यात प्रथमच आमदार रामदास मसराम यानी घेतला जनता दरबार,नागरीकांचा उत्स्फूर्त सहभाग
कोरची तालुक्याच्या इतिहासात प्रथमच आमदाराचा जनता दरबाराचे आयोजन आज दि.१६ सप्टेबंर मंगळवार रोजी दूपारी १२ ते ४ वाज़े दरम्यान करण्यात आले होते आमदार रामदास मसराम यांच्या निर्देशाने बिरसा मुंडा सभागृहात हा ऐतिहासिक जनता दरबार पार पडला यावेळी जनतेचा विविध समस्यावर चर्चा होत त्या मार्गी संबंधित अधिकार्याना निर्देश देण्यात आले यावेळी तालुक्यातील जवळपास सर्वच गावांतील नागरिक आपल्या समस्या घेऊन आले होते.