मुर्तीजापूर: शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार हेक्टरी मदत द्या,काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे
शासन लबाड आहे, बोलते ते करत नाही. आजवर एकही आश्वासन पूर्ण न करणाऱ्या शासनाने, अतिवृष्टीमुळे झालेले शेतीचे प्रचंड प्रमाणातील नुकसान विचारात घेऊन, शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी. नदीकाठच्या खरडवून गेलेल्या शेतजमीनीला हेक्टरी एक लाखाची मदत द्यावी, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी शासकीय विश्रामगृह येथे सोमवार २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता आयोजित पत्रकार परिषदेतून शासनाला दिला.