रामटेक: राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियन नागपूर जिल्हाध्यक्षपदी रामटेकच्या अमित अंबादास यांची नियुक्ती
Ramtek, Nagpur | Sep 18, 2025 राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनच्या नागपूर जिल्हा अध्यक्षपदी रामटेकच्या अमित अंबादे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवार दिनांक 18 सप्टेंबरला दुपारी एक वाजता च्या दरम्यान महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियन प्रदेशचा अध्यक्ष उमेश दादा पाटील यांच्या उपस्थितीत हॉटेल रेडिसन ब्ल्यू नागपूर येथे विदर्भ प्रदेश अध्यक्ष वर्षाताई शामकुळे यांनी या नियुक्तीची घोषणा केली.