कुरखेडा: महात्मा गांधी तंटामुक्त समिती गेवर्धा यांचे पुढाकारातून प्रेमियुगल विवाहबद्ध
मधुसूदन हेमंत नैताम मु. सावलखेडा ता.कुरखेडा जि. गडचिरोली व भाग्यश्री रैसू दरो मु.बिजापूर पो.चारभट्टी ता.कुरखेडा जि.गडचिरोली यांचे कूरखेडा येथे शिक्षण घेत असताना ओळखी झाली.ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि शेवटी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला मात्र कूटूंबाचा विरोध असल्याने दोघांनी तंटामुक्त समिती पदाधिकारी गेवर्धा यांची भेट घेऊन लग्न लावून देण्याची विनंती केली.तंटामुक्त समितीने दोघेही बालीग असल्याची खात्री पटवत पूढाकार घेत त्यांचा विवाह लावून दिला.