शहादा: वडगाव येथील शेतातील विहिरीतून १० हजारांची विद्युत मोटर चोरी, शहादा पोलिसात गुन्हा दाखल
शहादा तालुक्यातील वडगाव शिवारातील विहीरीतून चोरट्यांनी 10 हजार रूपये किंमतीची विद्युत मोटार लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहादा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शिवारातील सर्व्हे न.332/3 मधील पिताबाई प्रताप पावरा यांच्या विहीरीतून चोरट्यांनी एचपी कंपनीची विद्युत मोटार लंपास केली आहे. याप्रकरणी पिताबाई पावरा यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.