जालना: 3 गावठी पिस्टल व 5 जिवंत काडतुसांसह 3 आरोपी जेरबंद; जालना पोलीस दलाची आणखी एक धडाकेबाज कारवाई
Jalna, Jalna | Oct 31, 2025 स्थानिक गुन्हे शाखेने जालना शहरात कारवाई करत 3 गावठी पिस्टल आणि 5 जिवंत काडतुसे असा एकूण 1 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. शुक्रवार दि. 31 ऑक्टोबर 2025 रोजी दु. 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणार्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला निर्देश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई क