देवणी: देव नदीवर उभारण्यात आलेल्या ब्रिज कम बॅरेजचे आ. निलंगेकर यांच्या हस्ते उद्घाटन. नागरिकांना मिळाला एक पर्यायी रस्ता
Deoni, Latur | Oct 27, 2025 देवणी तालुक्यातील श्रीक्षेत्र मौजे संगम येथे अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळ्याला आमदार निलंगेकर यांनी भेट देऊन दर्शन घेतले. तसेच गावातील देव नदीवर उभारण्यात आलेल्या ब्रिज कम बॅरेजचे उद्घाटन देखील केले. या अगोदर श्री संगमेश्वरला जाण्यासाठी देव नदी ओलांडून जावे लागत होते. अनेकदा पावसाळ्यात नदीला पाणी वाढल्यानंतर नागरिकांना रहदारीसाठी अडथला निर्माण होत होता. तसेच याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणलोट असल्यामुळे पावसाचे पाणी देखील वाहून जात होते.