सेनगाव: दिव्यांग बांधवांचे रखडलेले मानधन तात्काळ द्या अन्यथा तीव्र आंदोलन दिव्यांग भव्य क्रांती संघटनेचे तहसीलदारांना निवेदन
दिव्यांग बांधवांचे रखडलेले मानधन तात्काळ देण्याच्या मागणीसाठी आज तहसीलदार सेनगाव यांना दिव्यांग बांधवांच्या वतीने निवेदन देऊन निषेध नोंदविण्यात आला. अनेक महिन्यापासून दिव्यांग बांधवांचे मानधन रखडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून त्यामुळे तात्काळ या प्रकरणाची दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संपत लोणकर व शेतकरी नेते मारोती गिते यांनी आज दिला आहे.