उरण: भेंडखळ गावातील स्मशानभूमीजवळ भीषण अपघात - एकाचा मृत्यू
Uran, Raigad | Apr 18, 2025 उरण तालुक्यात ट्रेलर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. भेंडखळ गावातील स्मशानभूमीजवळ भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी (दि.17) सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या अपघात नारायण एस. भोईर (65) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सविस्तर वृत्त असे की, भेंडखळ गावातील स्मशानभूमीजवळ भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी (दि.17) सायंकाळच्या सुमारास घडली आहे. श्री कृपा ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रेलरने जोरदार धडक दिल्याने नविन शेवा गावातील मोटरसायकलस्वार नारायण एस. भोईर (65) यांचा जागीच मृत्यू झाला.