धुळे: शिक्षक समायोजन घोटाळा: आरपीआय नेते डॉ. साळुंखे यांनी थेट सीईओला दिले निवेदन, अधिकाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार
Dhule, Dhule | Oct 18, 2025 धुळे जिल्हा परिषदेतील शिक्षक समायोजन प्रक्रियेत झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात आरपीआय नेते डॉ. पंकज साळुंखे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अजीझ शेख यांना निवेदन देत आक्रमक भूमिका घेतली आहे. शिक्षणाधिकारी किरण कुवर आणि सीईओ शेख यांनी नियमबाह्य नियुक्त्या केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीसही नियुक्ती दिल्याचा दावा साळुंखे यांनी केला असून, याविरोधात खंडपीठात याचिका दाखल केली आहे..