अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्या वाहनांवर केलेल्या कारवाईचा पंचनामा बदलून आम्ही निर्दोष असल्याचा पंचनामा करुन द्या यासाठी मुरूम तस्करांच्या गँगने कुकाना येथील महिला मंडलाधिकारी यांच्या वाहनाला वाहन आडवे करून अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या देत दहशत माजवली.याप्रकरणी नेवासा पोलिसांत सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.